राजे चंद्रराव मोरे परिवाराचा इतिहास

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 उचाट जावली/महाबळेश्वर-सातारा
2 शिंदी जावली/महाबळेश्वर-सातारा
3 कांदोशी खेड-रत्नागिरी
4 चाटव खेड-रत्नागिरी
5 बिरमणी खेड-रत्नागिरी
6 वडगाव बुद्रुक (खेड-रत्नागिरी)
7 सणघर (खेड-रत्नागिरी)
8 वडगाव खुर्द (खेड-रत्नागिरी)
9 किंजळे खेड-रत्नागिरी
10 अस्तान खेड-रत्नागिरी
11 महाळुंगे भिवंडी-ठाणे
12 रवदी भिवंडी-ठाणे
13 उचाट वाडा-पालघर
14 उचाट-रानसई र खालापूर-रायगड
15 आपटी-शिंदी खालापूर-रायगड
16 परखंदे-शिंदी खालापूर-रायगड
17 कुंभाड-शिंदी खेड-रत्नागिरी
18 बिजघर-शिंदी खेड-रत्नागिरी

दूदगाव (महाबळेश्वर) व गाव समूह

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 दूदगाव महाबळेश्वर-सातारा
2 गोळगणी पोलादपूर-रायगड
3 परसुले पोलादपूर-रायगड
4 आडावळे पोलादपूर-रायगड
5 पार्ले पोलादपूर-रायगड
6 दहीवड महाड-रायगड
7 तिसंगी-आपटाकोंड खेड-रत्नागिरी
8 पिंपर गुहागर-रत्नागिरी

कळमगाव व गाव समूह

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 कळमगाव महाबळेश्वर-सातारा
2 वाकी महाड-रायगड
3 चीम्भावे महाड-रायगड
4 कांबळे महाड-रायगड
5 महालगूर पोलादपूर-रायगड

पार व गाव समूह

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 पार महाबळेश्वर-सातारा

पार्ले व गाव समूह

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 पार्ले पोलादपूर-रायगड

बिरमणी (महाबळेश्वर) व गाव समूह

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 बिरमणी महाबळेश्वर-सातारा

हातलोट (महाबळेश्वर) व गाव समूह

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 हातलोट महाबळेश्वर-सातारा
2 खरब-रावतळी महाड-रायगड
3 ताम्हाणे महाड-रायगड
4 विन्हेरे महाड-रायगड

बिरवाडी (महाबळेश्वर) व गाव समूह.

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 बिरवाडी महाबळेश्वर-सातारा
2 साईकडे पाटण-सातारा
3 वंडूर सातारा

दरे व दरे गाव समूह

अनुक्रमांक वंशावळ गावे
1 मौजे दरे महाबळेश्वर-सातारा
2 तुटवली पोलादपूर-रायगड
3 कोतवाल पोलादपूर-रायगड
4 कोंढवी पोलादपूर-रायगड
5 पैठण पोलादपूर-रायगड
6 कातळी पोलादपूर-रायगड
7 तुळशी खेड-रत्नागिरी
8 कशेडी खेड-रत्नागिरी
9 कुंभार्डे महाड-रायगड
10 वावर्ली कर्जत-रायगड
11 बोरगाव कर्जत-रायगड
12 पळसदरी कर्जत-रायगड
13 कार्ले लोणावळा-पुणे
about image

राजे चंद्रराव तपशील...

  • पहिले-- राजे चंद्रराव मोरे.
  • दुसरे-- राजे चयाजीराव मोरे.
  • तिसरे-- राजे भिकाजीराव मोरे.
  • चौथे-- राजे शोधाजीराव मोरे.
  • पाचवे-- राजे येसाजीराव मोरे.
  • सहावे-- राजे गोदाजीराव मोरे.
  • सातवे-- राजे बाळाजीराव मोरे.
  • आठवे-- राजे दौलतराव मोरे.
  • नववे--राजे कृष्णराव मोरे (दत्तक पुत्र)

जय छत्रपती शिवराय..! जय राजे चंद्रराव..!

  1. आम्ही मोरे थोडक्यात क्षत्रिय मौर्य घराणे, चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचा महाराष्ट्रातील राज वंश. आता चंद्रगुप्त मौर्य यांबाबत सांगणे म्हणजे सूर्याला पणती दाखवण्या सारखे, कारण अखंड भारत वर्षाला त्यांच्या कर्तृत्वाबाबत माहीती आहे व पराकोटीचा आदरही.
  2. अंदाजे १४९० पासून राजे चंद्रराव (मोरे) घराणे जावलीच्या दुर्गम भागात संघराज्य पद्धतीने राज्य करीत होते. स्वतःच्या मर्दुमकीवर, पराक्रम गाजवून तत्कालीन आदिलशहाकडून कर्तृत्वाची पोचपावती म्हणून अभेद्य, निबिड अशी "जावली" आपल्या अधिपत्याखाली मोऱ्यांनी घेतली व "चंद्रराव" किताब मिळवला.
  3. "चंद्रराव" हे कुणा एका राजाचे नाव नसून ती उपाधी आहे व अशा एकूण ९ चंद्ररावांच्या पिढीने ही उपाधी लावून जावलीत राज्य केले.
  4. राजे शिवछत्रपतींच्याही जन्मा अगोदर ७ चंद्ररावांनी जावलीत राज्य केले होते हे वास्तव ध्यानात घ्यावे.
  1. चौदावा बहामनी सुलतान अल्लाउद्दीनशाह याचा वजीर मल्लिक उत्तुजार उर्फ महमंद गवान जेव्हा कोकण प्रांत ताब्यात घेण्यास व हिंदू धर्म बुडविण्यास आला होता तेव्हा शिर्के राजांनी गोत्र-बंधू शंकरराय मोरे यांच्याशी संगनमत करून मल्लिक उत्तुजारला जावलीत बोलावला व रात्रीच्या अंधारात मोऱ्यांनी रातोरात गनीम कापून काढला व कोकणपट्टीवर आलेलं सुलतानी-इस्लामी संकट दूर झालं. ही धूर्त "गनिमीकावा युद्धनीती" सर्वप्रथम मोऱ्यांनी अंमलात आणली आणि पुढे याची पुनरावृत्ती शिवछत्रपतींनी अफझलखान वधाच्यावेळी याच जावलीत अंमलात आणली हे जगजाहीर आहे.
  2. राजे "चंद्रराव" खरे हिंदू धर्मात्मा होते. श्री क्षेत्र महाबळेश्वर-पंचगंगा, सात शिवपुऱ्या उभारणं हे एका अस्सल हिंदू धर्मनिष्ठ राजाचे प्रतीक आहे. सावित्री नदीच्या उगमापासून मोरे घराण्याने महाबळेश्वर, पर्वत, चकदेव, घोणसपूर, तळदेव, गाळदेव, धारदेव, मोळेश्वर, बाणकोट इत्यादी बारा शिवपुऱ्या निर्माण केल्या. हरिहरेश्वरच्या मंदिर परिसरातील परिक्रमा, लोटे-परशुराम मंदिराच्या पायऱ्या ही कामे सुद्धा राजे चंद्रराव मोरे यांनीच केली.
  3. मोरे यांचा बखरकार लिहितो " एक वचनी चंद्रावर हुजूर, तेव्हा चंद्रराव आडेल शिपाई, आजदादेघरचा राऊत मर्दाना, चंद्ररायाचे राज्य धर्माला जावलीकर राज्य करीत असता, राजियातील हिस्से एक हिसियाची शिबंदी, पायेहासम, एक हिसियाची अन्नछत्रे व धर्म खैरात एक हिसियाची, खाजगी खर्च, तोसीखाना, पागा, सुरातखाना, अदिलखाना वगैरे, एक हिसा देवस्थली देव, शिवालये, महाबलेश्वरी पंचगंगा, चंद्ररायाही बांधल्या. ऐशा सात शिवपुऱ्या चंद्ररायाही आपले वंशपरंपरा जेथून जावलीचे राज्य जाले, तेथून संपेल तेथवर देवस्थली बाकी चालवली ऐसें धर्मराजे मोरे जाहले".

राजे चंद्रराव मोरे यांचे, अलोरे गाव, चिपळूण येथे मंदिरात “शिल्प” आहे. ज्याची नित्यनियमाने स्थानिक ग्रामस्थां मार्फत पूजा केली जाते.

  1. ऐन उमेदीत महाराष्ट्रात "स्वराज्य संकल्पना" राबवू पाहणारा एक भावी महत्वाकांक्षी राजा आणि जावली खोऱ्यात गेल्या ८ पिढ्या राज्य करणारा प्रस्थापित राजा यांच्यामध्ये सत्तासंघर्ष, बेबनाव आणि अनुषंगाने राजकीय डावपेच, कुरघोडी व अखेरीस रक्तपात हे अपेक्षितच होते व जावली प्राप्त झाल्याशिवाय स्वराज्य साधत नाही हे ही अंतिम सत्यच. यात राजे चंद्रराव मोरे घराण्यासाठी "स्वराज्यद्रोही" ही संकल्पना कुणीही पुढे आणण्याचे, रेटण्याचे अजिबात कारण नाही. आणि त्याउपर जावली प्रांत स्वराज्यात सामील झाला म्हणून आम्हाला, राजे चंद्ररावांचे वंशज म्हणूनही "दुःख" करण्याचे किंवा "शोक" करण्याचेही कारण नाही. उलटपक्षी शिवछत्रपतींच्या सेवेतही ‘सत्तांतरानंतर’ मोरे घराण्याने आपला पराक्रम आणि मर्दुमकी गाजवली होती, स्वराज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाच होता. एक गोष्ट आपण तटस्थ पद्धतीने मान्य केली पाहिजे ती म्हणजे, राज्य निर्माण, राज्य विस्तार हा तर बहुतांशी हिंदुस्तान अनुषंगाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा हजारो वर्षांपासूनचा गाभा आहे, आणि हे सत्य कुणीही नाकारू शकणार नाही.
  2. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयाने प्रेरित झाले, त्याआधी "जावलीत" राजे चंद्रराव मोरे यांचे अधिपत्याखाली जवळपास १६० वर्षे राज्य होते हे जगजाहीर ते ही १६५७ पर्यंत.

बंधूंनो, जावली स्वराज्यात आल्यावर राजे शिवछत्रपतींच्या सोबतच ‘मोरे घराणे’ होते. याचसाठी काही महत्वपूर्ण ऐतिहासिक नाव-घटना खाली नमूद करतो त्याची दखल घ्यावी जेणेकरून स्वराज्यातील राजे चंद्रराव मोरे कुलबांधवांचं योगदान व तदनंतरही स्वराज्य-महाराष्ट्र व हिंदुस्थानासाठी दिलेलं योगदान आपल्या ध्यानात येईल.

  • गंगाजी उर्फ गोगाजी मोरे-देशमुख नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील हतगड किल्ला आदिलशहाकडे होता, त्याचा सुभेदार शुराब खान हा किल्लेदार होता. सन १६६३ मध्ये छत्रपतींच्या आज्ञेनुसार गोगाजी मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला ताब्यात घेतला.
  • छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत नाशिक येथील रामशेज किल्ल्याच्या लढाईत मानाजीराव मोरे यांच योगदान एकदा नीट वाचा. आजही शिवजयंती निमित्त स्वराज्य रथ समिती, पुणे यात दक्षिण दिग्विजय सरदार मानाजीराव मोरे यांचाही रथ निघतो.
  • काशीनाथ नारायण साने यांनी संपादित केलेल्या "चित्रगुप्त विरचित" बखरीतील उल्लेखानुसार मानाजी उर्फ मानसिंगराव मोरे, यांचेसह पोलादपूर-खेड परिसरातील दरेकर (मूळचे मोरे) बंधूंचे पूर्वज बाळाजीराव दरेकर, येसाजीराव दरेकर, गणोजीराव दरेकर, तानाजीराव दरेकर, रायाजीराव दरेकर हे सर्व शिवरायांच्या पायदळातील अधिकारी होते. त्यातच पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत येसाजीराव दरेकर हे दाभोळ सुभ्याचे सुभेदार असल्याचा उल्लेख आहे.
  • कांदाटकर मोऱ्यांच्या वंशजांनी स्वराज्याच्या सेवेत अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. इसवी सन १७०० दरम्यान औरंगजेबाने साताऱ्याच्या अजिमतारा (अजिंक्यतारा) गडास वेढा दिला होता व छत्रपती राजाराम महाराज आतमध्ये होते. महाराजांच्या आज्ञेनुसार चांदजीराव मोरे, येसाजीराव मोरे, तानाजीराव मोरे यांनी कांदाट वरून आपल्या फौजेनिशी जाऊन शर्थीने वेढा उठवला आणि महाराजांची सुटका झाली.
  • महाराणी ताराबाई साहेब यांच्या कारकिर्दीत प्रतापराव मोरे हे नावाजलेले सरदार होते.
  • माधवराव पेशव्यांच्या काळात खंडेराव दरेकर (मोरे) यांना "सरलष्कर" हा किताब दिला गेला होता.

राजे चंद्रराव मोरे वरदायिनी श्री निरिपजी देवी, कांदाट, जावली (ता. महाबळेश्वर)

  • रघुनाथ यादव चित्रे उर्फ 'चित्रगुप्त' यांनी नाना पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरून "पानिपतची बखर" हा अमूल्य ग्रंथ लिहिला त्यात धारातीर्थी पडलेल्या खालील मोरे रणधुरंधरांचा समावेश आहे.
    • कृष्णाजी मोरे
    • भानाजी मोरे
    • म्हासाजी मोरे
    • अमृतराव मोरे
  • खेड, धवडे-बांदरी मधील अस्तानकर मोरे यांच्या वंशातील हरबाराव धुळप हे प्रसिद्ध आंग्रे घराण्याच्या आरमारात सुभेदार होते. पेशव्यांनी विजयदुर्ग घेतल्यावर धुळप सरदार विजयदुर्गचे किल्लेदार झाले. हंबीरराव धुळप, आनंदराव धुळप यांनी पेशव्यांच्या काळात मोठा पराक्रम गाजवला. कृष्णराव धुळप हे १८१८ पर्यंत पेशव्यांच्या आरमाराचे सरदार होते.
  • इतकेच कशाला आजही शिवछत्रपतींच्या प्रेरणेने, विचारधारेने स्थापन झालेल्या विविध संघटना, राजकीय पक्ष, शिक्षण, समाजकारण, क्रीडा, भारतीय सैन्य, महाराष्ट्र पोलीस, राज्य-केंद्र प्रशासन यात मोरे परिवार अग्रणी आहे.
  • युसूफ आदिलशाहाच्या काळात मोरे घराणे कर्नाटकात नाईक घराणे म्हणून प्रसिद्ध होते आदिलशहाने परसोजी मोरे व जयाजी मोरे या दोघा बंधूंना १२ हजार स्वार देऊन शिर्के राजघराण्यावर पाठवले दोघा बंधूंनी शिर्के घराण्याचा पराभव करून महाबळेश्वर व जावळी जिंकून घेतली यानंतर जावळीवर मोरे घराण्याची सत्ता सुरू झाली परसोजी मोरे नंतर त्याच्या मुलांमध्ये वाद निर्माण झाला तेव्हा आदिलशहाने हा वाद मिटवला परसोजी मोरेच्या पाच मुलांना हणमंतराव, बागराव, कमळराव, सुर्यराव, व चंद्रराव असे किताब दिले आणि चंद्रराव याला मुख्य नेमून त्याला जावळी येथे राहण्यास सांगितले तर बाकीचे जोरखोरे, चतुर्बेट, महाबळेश्वर, मोळेश्वर येथे राहत असत महाबळेश्वरचा महादेव हा मोरे घराण्याचे कुलदैवत होते अशा या मोरे घराण्याने व्यापार श्रेत्रात बरीच भरभराटी आणली होती त्यामुळे त्यांचा खजिना ही चांगला भरला होता महाड, बाणकोट, दाभोळ या आंतरराष्ट्रीय बंदरातून आलेला हस्तिदंत, हिरे-मोती, कापड, आणि तगडे अरबी घोडे असा मौल्यवान माल घेऊन व्यापारी तांडे, मोरे राज्यातील पार घाटातून महाराष्ट्रात उतरत असत चंद्रराव मोरे या व्यापाऱ्यांकडून जबरी जकात कर वसूल करी व त्याबदल्यात व्यापाऱ्यांना संरक्षण देई "तुमचा सुताचा तोडा चोरीला गेला तर त्या बदल्यात तुम्हास सोन्याचा तोडा बक्षीस देऊ" असे हमीपत्र चंद्रराव मोरे या व्यापाऱ्यांना लिहून देत असे..

श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. गाव प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. महाबळेश्वर - पार या रस्त्याने ते महाबळेश्वरपासून २० मैलावर येते. सर्वप्रथम राजे चंद्रराव मोरे घराण्याने हे मंदिर बांधले. ज्याचा नंतर स्वराज्यामध्ये शिव छत्रपतींनी जीर्णोद्धार केला.

आत्तापर्यंत झाकून ठेवलेला "महाराष्ट्र" मधील आद्य मराठा राज्याचा भव्य-दिव्य इतिहास..

०१.

चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे महाराष्ट्रातील वंशज म्हणजे जावलीचे राजे चंद्रराव (राव मोरे) घराणे.

०२.

धर्म स्वाभिमान रक्षणासाठी सर्व सुखांवर पाणी सोडून, स्थलांतर प्रवास करीत करीत दक्षिणेत व नंतर जावली प्रांतात स्थिरावलेले मौर्य-मोरे राजे (राव मोरे) घराणं.

०३.

जावलीत संघराज्य पद्धतीने १६० वर्षे सुराज्य चालवणारे असे चंद्रराव परिवार. जसे USA ,UAE असं पुरातन युनायटेड स्टेट्स ऑफ जावली USJ अशी पद्धत होती , आणि सर्वोच्च प्रमुखाला चंद्रराव म्हणून ओळख होती. मौर्य संघ राज्यपद्धतीची परंपरा जावळीत जपली होती. असं उत्तम प्रशासन असणारे राज घराणे. १६० वर्षात एकूण आठ चंद्रराव राजे यांनी संघराज्य पद्धतीने राज्यकारभार चालवला.

०४.

हिंदुत्वाचा २३०० वर्षांचा मौर्य ते मोरे असा प्रवास धागा जपणारे जावलीतील राजे मोरे परिवार, अनेक आक्रमण व संघर्ष यांना तोंड देत धर्म व धर्मस्थल सुरक्षित ठेवणारे घराणं.

०५.

जावली प्रांतात बारा प्रती जोतिर्लिंग निर्माण संकल्प धरून यशस्वी प्रयत्न करणारे राजे (राव) मोरे घराणं. (जावलीतील सप्तशिवालय)

०६.

आद्य मराठा राज्यकर्ते म्हणून "सार्वभौम राज्यचिन्ह मोरचेल" धारण असणारे राज घराणे.

०७.

स्थानिक सतीच्या रूढी चालीरीतीस छेद देऊन सुधारित कार्यपद्धती साकारणारे आद्य राज घराणे.

०८.

घनदाट अरण्य असलेल्या जावलीप्रांतात महाबळेश्वर-पार व इतर ठिकाणी व्यापाऱ्यांना अभय, बाजारपेठ वसाहती यांची उभारणी व व्यापारास प्रोत्साहन निर्माण केले.

०९.

महाबळेश्वर पंचगंगा मंदिर जीर्णोद्धार व भाविकांना संरक्षण तसेच अनेक घाटमार्ग यांना संरक्षण सुविधा निर्माणकर्ता परिवार.

१०.

धर्म अस्तित्व धोक्यात येण्याच्या परिस्थितीत असताना राजे शिर्के यांच्या मदतीला राजे मोरे असे एकत्र येऊन, शत्रु बहामनीचा सेनापती मलीक उत्तुजारचा गनिमीकाव्याने धुव्वा उडविला. उत्तम मित्रत्व व गनिमीकावा याचे उत्तम उदाहरण समोर ठेवणारे घराणं.

११.

रायरी (रायगड) किल्ला आदिलशाहीच्या नियंत्रणातून स्वतःच्या नियंत्रणात आणणारे राजे मोरे घराणं, ज्याचा उपयोग पुढे स्वराज्यात झाला.

१२.

बंदरांवर उतरलेला माल यांची वाहतूक जावळीच्या घाटमार्गाने होऊन माल विजयनगर पर्यंत पोहचवला जाई ....व्यापाऱ्यांना सुरक्षा पुरवली जात असे, दळणवळण सुविधा चौक्या टेहळणी बुरुज माध्यमाने अधिक गस्त पथक बंदोबस्त राखून व्यापार वृद्धीस चालना दिली जात असे.

१३.

जावळीच्या घाट प्रवासात माल हरवला किंवा चोरीला गेला तर त्या किमतीचे सोनं देण्यात येईल असं राजे मोरे यांच्याकडून व्यापारी यांना अभय पत्र देण्यात येत होतं (सध्याच्या भाषेत Insurance योजना)

१४.

जावली प्रांतात एकूण १७ किल्ले होते व १२ हजार सैन्य बळ होते, २००० च्या आसपास घोडदळ व जास्त पायदळ होते. सैन्य ७-८ ठिकाणी विभागलेल असायचं. स्थानिक सैन्य कोणत्याही वातावरणात तग धरणारे चपळ व काटक होते. स्थानिक तरुणांना अग्रक्रम नियुक्ती असे.

१५.

घनदाट जंगल असल्याने शेतीसाठी जमीन उपलब्धता कमी म्हणून जंगल व घाटमार्ग हिच साधन संपत्ती असल्याने जंगलांचे सरंक्षण वर जास्त लक्ष केंद्रित होते....पर्यावरण व जंगल साधनसंपत्तीच जतन होत असे.

१६.

राज्यातील उत्पनाचे खालिप्रमाणे चार भाग करून...


१) सैन्यबळ व्यवस्था
२) अन्नछत्र व धर्मदान
३) धर्मस्थल उभारणी
४) खाजगी खर्च, पागा, सुरातखाना वैगरे, असं सोप्प्या पद्धतीने नियोजन केले जात असे. गंगाजली म्हणून संपत्तीचं बचतीवर भर देण्यात येत असे.

१७.

पराक्रम गाजवणारे मानाजीराव मोरे दक्षिण दिग्विजय सरदार रामशेज किल्ल्याच्या लढाईत स्वराज्य साठी योगदान देणारे चंद्रराव घराण्याचे वंशज.

१८.

नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील हतगड किल्ला शिवछत्रपतींच्या आदेशाने ताब्यात घेणारे गोगाजीराव मोरे-देशमुख.

१९.

शिवरायांच्या पायदळाचे अधिकारी दरेकर (मूळचे मोरे) छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत दाभोळ सुभ्याचे सुभेदार दरेकर, पेशव्यांच्या काळखंडात सरलष्कर 'किताब मिळवणारे दरेकर (मोरे).

२०.

औरंगजेबाच्या फौजेने अजिंक्यतारा गडास दिलेला वेढा उठवून राजाराम महाराज यांची सुटका करणारे पराक्रमी कांदाटकर मोरे हे चंद्रराव घराण्यातील योद्धे.

२१.

खेड धवडे-बांदर मधील आस्तानकर मोरे यांचे वंशज , पराक्रमी धुळप उपाधी लाभलेले. यांनी आरमारात मोठा पराक्रम गाजवून आरमाराचे वरिष्ठ अधिकारी व विजयदुर्गचे किल्लेदार म्हणून पेशव्यांच्या कालखंडात कर्तव्य जपणारे चंद्रराव घराणं.

२२.

निजामशाहीचा दुसरा बुऱ्हाण निजाम याच्या फौजेला जोरदार तडाखा देऊन त्यांच्या नाकासमोर त्यांचा ध्वज कापून आणणारे चंद्रराव घराणं..

२३.

आदिलशाही अधिकारी राजे चंद्रराव मोरे यांना पत्र लिहिताना ....
पत्रात राम राम लिहीत, इतका धार्मिक आदर- दरारा जावलीत होता. धर्मनिष्ठेने राम नाम जतन करून ठेवणारे असे जावलीतील घराणं म्हणजे चंद्रराव परिवार.

२४.

लिंगायत जंगम शिवशंकर भक्त उपासना करणारा जंगम समाज यांस आपल्या देवस्थान मध्ये सन्मानाने नियुक्ती करून त्यांना त्या काळात त्यांची सोय (आरक्षण) देणारं घराणं.

२५.

पुरातन श्री. हरिहरेश्वर व श्री. परशूराम देवस्थान यांना विशिष्ट बांधकाम डागडुजी करिता साहाय्य निधी उपलब्ध करणारे घराणं.

Brand
वेबसाइट भेटींची संख्या:

Contact Details