जावलीकर ‘राव’ मोरे परिवार संघटन-संस्था कशासाठी...??

आजतागायत एकच रूढी-परंपरा,सगे सोयरे व एकच ऐतिहासिक मूळ स्रोत असलेले ‘राजे चंद्रराव मोरे’ यांचे वंशज ‘राव’ मोरे कधीच एकत्र आले नव्हते. त्यामुळे हे नवीन रसायन आपल्या राव-मोरे परिवारात एक चैतन्याच, स्वाभिमानाच आणि आत्मविश्वासाच पोषक वातावरण तयार करेल यात शंकाच नाही. अर्थात आपल्या घराचा उंबरा ओलांडल्यानंतर अशी असंख्य उदाहरणे इतर समाजाची, ज्ञाती बांधवांची आपणास जागोजागी दिसतील फक्त आपण आजतागायत असा कधी विचारच केला नव्हता.

जावलीधीपती‘राजे चंद्रराव मोरे’यांच्या ८ पिढ्यांचा जवळपास सन १४९० पासूनचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य संकल्पना आणि त्या दरम्यानचा राजे चंद्रराव यांच्याशी झालेला सत्ता संघर्ष आणि जावली पतनानंतर ‘स्वराज्य-निष्ट’राजे चंद्रराव मोरे यांचे घराणे आणि युद्धात मर्दुमकी गाजवणारे, आजवर कधीही महाराष्ट्राच्या इतिहासाने गांभीर्याने न घेतलेले अनामिक परिवारातील शूरवीर या सर्व महत्वपूर्ण मुद्द्यांना समोर आणण्यासाठी स्वतः ‘राव’ मोरे परीवारानेच एखाद्या माध्यमातून पुढाकार घेणे ही काळाची नव्हे; महाराष्ट्राच्या इतिहासाची गरज होती.

हे संघटन-संस्था झाली तर गाव (ग्रामीण) पातळीवर, किंवा समूह-गाव पातळीवर अपेक्षित अशी पारिवारिक सामाजिक कामे करण्यास एक मोठं अस हक्काचं व्यासपीठ लाभेल. ज्यातून आर्थिक स्रोत, मनुष्य बळ त्याचबरोबर योग्य अशी वैचारिक भूमिका मांडून दिशा देणारी व्यक्तिमत्त्व भविष्यात लाभतील...

या संघटन-संस्थेची व्याप्ती लक्षात घेता समाजहीतैशी असे ग्रामीण-शहरी भागातील आपले सक्षम बांधव-भगिनी, आबाल-वृद्धांसाठी, भावी पिढी सक्षम करण्यासाठी महत्वाकांक्षी उपक्रम फक्त हातात न घेता ते पूर्णत्वास नेण्याची जिद्द करतील त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल. ज्याला फक्त फुंकर मारून एखुन्कार भरून जिवंत ठेवण्याच काम संस्थेला करावे लागेल.

या संघटन-संस्थेच्या निमित्ताने ‘राजे चंद्रराव मोरे’ यांच्या परिवाराची कौटुंबिक व्याप्ती तसेचइतर परिवारातील आजतागायत न भेट झालेल्या बांधवांची ओळख, आपसातील जिव्हाळा वाढेल. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ बंधूंचे मार्गदर्शन भावी पिढीलाच नव्हे तर पोटा-पाण्यासाठी शहरी-ग्रामीण भागात टोकाची लढाई लढणाऱ्या आपल्या तरुण पिढीलाही मिळेल.

आज विविध क्षेत्रात आपल्यातील मान्यवर बंधू यशस्वीरीत्या स्थिरस्थावर आहेत. त्यांच्या संघर्षाच्या काळातील मानसिकता-जिद्द-ध्येय वेडेपणा-सचोटी ही जिवंत उदाहरणे आपल्या तरुणाईला वेळोवेळी लाभतील. ज्याचा पगडा या युवा मनांवर बसण्यास जास्त त्रास होणार नाही व तो चिरंतर टिकण्यास संस्थेच्या व्यासपीठाची मदतच होईल.

संघटन-संस्थेच्या माध्यमातून जी सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्या बंधूंची फळी उभी राहील त्यांच्या प्रत्येक अभिनव संकल्पनेला संपूर्ण राव-मोरे परिवाराचा मानसिक-शारिरीक असा खंबीर आधार मिळेल. याने आजतागत आपल्यातील बंधूं-भगिनींना समाजासाठी आपल्या परिवारासाठी आपण काही तरी केले पाहिजे याचीही जाणीव अपरोक्षपणे होईल व त्यासाठी आपसातला बंधू-भाव सौहार्दाने जपून ही मंडळी आपसूक पुढे येतील.

सरकारी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, आरोग्य, कायदा सुव्यवस्था, आध्यात्मिक, व्यापार-स्वयंरोजगार, राजकारण, समाजकारण अश्या विविध क्षेत्रात आपले राव मोरे बंधू अग्रेसर आहेत. या सर्व बुद्धीमंतांचा खऱ्या अर्थाने परिसस्पर्श आपल्या समाजाला या संघटन-संस्थेच्या निमित्ताने होऊ शकतो. ज्याने एक सुदृढ-सक्षम समाज तयार करण्यास-जपण्यास मोलाची मदत होऊ शकते.

काही अदृश्य पण साध्य होऊ शकतील अश्या संकल्पना

team

स्मृती स्तंभ

२१ व्या शतकात जिथे प्रत्येक मनाचा, भावनांचा, विचारांचा ताबा हा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ने घेतला असताना, परिवार म्हणून आपण एका विशिष्ट दर्जाचे आहोत, आपले आचार-विचार, रूढी परंपरा, ऐतिहासिक ओळख ही इतरांपेक्षा वेगळी आहे या सर्व बाबींवर अंतर्मुख होण्यास भावी पिढीला मदत होईल... अर्थात या संस्थेच्या माध्यमातूनच.

आज गेली साडेतीनशे चारशे वर्षे आपण आपले पै पाहुणे, सगे-सोयरे किमान आजतागायत टिकवून आहोत पण भविष्यात हे टिकेल का ? तर याच उत्तर कुणीही देऊ शकत नाही पण, किमान अखंड राव-मोरे परिवाराच्या माध्यमातून आपण आपल्या ‘राव’ समाजातील वधू-वरांना किमान या माध्यमातून अनाहूतपणे जोडले गेलेल्या सोयरे-पाहुणे यांचा या आधी कधीही उपलब्ध न झालेला मोठा असा दर्जेदार पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो. याने असंही होऊ शकत ते म्हणजे विविध कारणांमुळे, पर्याया अभावी आपली घसरलेली सोयरीक किमान या व्यासपीठावरून आपल्याला सावरायला मदत मिळू शकते. अर्थात ही अपेक्षाच आहे या संस्था उभारणीतून.

थोडक्यात वरील सर्व बाबींचा विचार करूनच “जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्था, मुंबई” ही दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी शासन दरबारी नोंदणीकृत झाली आणि समस्त राव मोरे परिवाराच्या एका नव्या अध्यायाला या निमित्ताने सुरवात झाली अस म्हटल्यास वावग ठरणार नाही.

Brand
वेबसाइट भेटींची संख्या:

Contact Details